बीड

घोडका राजुरी जवळ तरुणांना बसने चिरडले, तिघांचा मृत्यू, दोघे बचावले

तरुणांना बसने चिरडले, तिघांचा मृत्यू, दोघे बचावले

बीड –

बीड तालुक्यातील घोडका राजुरी जवळ एसटी बसने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या ५ जणांना चिरडल्याची दुर्दैवी दुर्घटना आज दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी घडली. बीड – परभणी गाडीने हा अपघात झाला असून घोडका राजुरी येथीलच तिघा जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

परभणी कडे जाणाऱ्या या गाडी मुळे अपघात झाला असून सकाळी रनिंगची प्रॅक्टिस करणाऱ्या या मुलांना बसने धक्का दिला. यातील दोघांनी वेळीच उड्या मारल्याने ते बचावले मात्र तिघे अपघातात जागीच ठार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तिन्ही मयत मुलांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. यामध्ये 1) सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे (वय २०) 2) विराट बब्रूवान घोडके (१९) 3) ओम सुग्रीव घोडके (२०) यांचा मयतामध्ये समावेश आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!