परळी : महिला सशक्तीकरणाची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून केली पाहिजे असे वक्तव्य बीड जिल्ह्याचे एसपी नवनीत काँवत यांनी सिरसाळ्यातील महिला मेळाव्यात मार्गदर्शन पर भाषणात केले .
सिरसाळ्यात श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय, फिनिक्स ग्रूप व भाई उद्धवराव पाटील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय सिरसाळा संयुक्त विद्यामाने /यांच्या वतिने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . ह्या कार्यक्रमास एसपी नवनीत काँवत उपस्थित होते. ते पुढे बोलतांना म्हणाले कि ,महिला सुरक्षेचा विषय आपण दरोज दैनिकातून वाचतो, पंरतु केवळ सामाजिक आणि माध्यमातून महिला सुरक्षेची चर्चा न होता याची सुरवात
घरापासून पासुन करावी . हे सांगत असतांना त्यांनी त्यांच्या आईचे व पत्नी चे उदाहरण दिले . ते म्हणाले कि, आईचे आठवी पास होती. पंरतु लग्न झाल्या नंतर वडिलांनी आईचे पुढील शिक्षण करत उच्च शिक्षित केले .आज आई शिक्षिका असून हेडमास्तर आहे. माझी पत्नी अधिकारी आहे .महिला सशक्तीकरणाची सुरुवात आम्ही आमच्या घरापासून केली आहे. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले कि,घरात मुलगा- मुलगी समान वागवावेत ,
घर प्रमुखा कडून भेदभाव होऊ नये, बरोबर सर्वांना वागणूक द्यायला हवी ,शिक्षण घेऊन जिवनात स्वताची ओळख निर्माण झाली तर कुणीही तुम्हाला चॅलेंज करु शकत नाही. शैक्षण आयुष्यात क्षेत्रात मुली टाॅपर दिसता परंतु त्याच मुली पुढे नौकरीत दिसत नाहीत. बारावी पर्यंत चे शिक्षण घेऊन लग्न केले जाते. सामाजिक स्तरावर महिला – पुरुषात भेद होऊ नये , महिला सरपंच झाली तर निर्णय त्याच महिलेने घ्यावेत
अधिकारांचा फायदा महिलांनी केला पाहिजे ,शिक्षणात महिलांची संख्या दिसते परंतु नौकरीत दिसत नाही. शिक्षण झाले कि लग्न लावून देणे योग्य नाही, तिला शिकू द्या असे म्हणत त्यांनी मोबाईल चा उपयोग जनरल नॉलेज साठी किती महत्वाचे हे सांगितले.मोबाईल आजच्या युगात महत्वाचे साधन आहे . ज्ञान/ माहिती साठी याचा उपयोग केला पाहिजे.
महिला सुरक्षेच्या बाबतीत बोलतांना म्हणाले कि,
तुमच्या वर जराही अन्याय झाला तर पोलीसा कडे या
आम्ही तुमच्या सेवेत सदैव तत्पर आहोत. छोट्यातल्या छोट्या बाबी सुद्धा सांगा, तरच क्राईम ला आळा बसले .दरम्यान पोस्को कायदा काय आहे याची माहिती काँवत यांनी विशद करत
पोलीस प्रशासनाने महिलां – मुलींच्या सुरक्षेच्या विविध उपक्रम सांगत दामिनी पथक बाबत सांगितले .
प्रगती करायची असेल तर वाद – जातीवाद, भेदाभेद संपवावा लागेल तर आपण प्रगती करु शकाल असेही म्हणाले .शेवटी बोलतांना सगळ्यांना आवाहन केले सगळ्यांनी साथ द्या बीड जिल्ह्याचे चित्र बदलून टाकू .
या वेळी व्यासपीठावर माजी आमदार व्यंकटराव कदम, प्रचार्य के के पाटील, डाॅक्टर सदाशिव देशपांडे,डाॅक्टर नावंदर,सह पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफळे, कार्यक्रमाची प्रस्तावना डाॅ.रशमि नावंदर यांनी केले तर कार्यक्रम परिचय डाॅक्टर उषा पवार मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाचे सुनियोजन प्रा. उषा माने मॅडम यांनी केले . कार्यक्रमास शेकडो महिला – मुली उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले व पंडित गुरु पार्डीकर यांच्या प्रतिमेस पुजन करुन करण्यात आले . कार्यक्रमात प्रसिद्ध एकांकिका सन्मानिय षंडानो सादर करण्यात आली .