बारामती – अजितदादांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन; असा निर्धार पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. तसेच (Pankaja Munde) पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार यांच्यासह बारामतीच्या विकासाचे विशेष कौतुक केले.
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पशुसंवर्धन व पर्यावरण (Pankaja Munde) मंत्री पंकजा मुंडे या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने (Baramati) बारामतीत विविध विकासकामांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने आलेल्या राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण (Pankaja Munde) मंत्री पंकजा मुंडे यांनी बारामतीच्या विकासाची पाहणी केली. बारामती शहरासह मतदारसंघात झालेल्या सर्वांगीण विकासाने त्या भारावून गेल्या; यानंतर त्यांनी मराठवाड्यात देखील बारामतीसारखाच विकास करण्याचा निर्धार केला.