बीड, दि. 15 (लोकाशा न्यूज) : परळीचे भूमिपुत्र आयआरएस विश्वास सोपानराव मुंडे यांचे प्रमोशन होऊन आता त्यांची पुण्याच्या आयकर आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे. याबाबत त्यांचे बीडसह संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन केले जात आहे.
विश्वास मुंडे हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील कनेरवाडीचे भूमिपुत्र आहेत. त्यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हेरवाडी (ता. परळी वैजनाथ, जिल्हा बीड) येथे झालेले असून रासायनिक अभियांत्रिकी पदाचे शिक्षण नागपूर येथे झालेले आहे. युपीएससीमध्ये त्यांनी देशात 223 वी रॅक मिळविलेली आहे. त्यांनी सेवेत आल्यानंतर जळगाव, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, मुंबई येथे कर्तव्य बजावलेले आहेत. सध्या ते पुणे येथे अप्पर आयकर आयुक्त म्हणून कर्तव्य बजावत होते. आता त्यांचे पुणे आयकर आयुक्त म्हणून प्रमोशन झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे. आयकर विभागात चोखपणे काम करून त्यांनी आपल्या याच कामातून कर्तव्यदक्षपणा सिद्ध करून दाखवलेला आहे. मागच्या काही महिन्यापूर्वी त्यांची छत्रपती संभाजीनगर आयकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती .याही ठिकाणी त्यांनी अगदी चोखपणे कर्तव्य निभावले होते. आता त्यांच्यावर पुण्याची नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे पुणे येथे आयकर आयुक्त पदावर ते आता काम पाहणार आहेत. त्यामुळे याही ठिकाणी अगदी चोखपणे ते कर्तव्य निभावतील असा विश्वास प्रत्येकाला आहे.त्यांची पुणे आयकर आयुक्त पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.