मुंबई।दिनांक ०६।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची आज नवी दिल्लीत राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी भेट घेऊन आभार मानले. यावेळी दोन्ही नेत्यांनी ना. पंकजाताईंना भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी भरभरून आशीर्वाद दिले.
आमचे नेते आदरणीय श्री अमितभाई शाह व राजनाथसिंह यांची आज भेट घेतली. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानले, आभार म्हणून मी त्यांना आमची आन-बान व शान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पुस्तक ‘श्रीमान योगी’ तसेच आमचा स्वाभिमान राष्ट्रसंत भगवान बाबा यांची मूर्ती भेट स्वरूपात दिली. याप्रसंगी त्यांनी उत्तम काम करण्यासाठी आशीर्वाद दिले असल्याचं ट्विट ना.पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.
••••