मुंबई।दिनांक ०६।
राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र असलेले ‘श्रीमानयोगी’ पुस्तक यावेळी ना. पंकजाताईंनी त्यांना भेट स्वरूपात दिले.
ना. पंकजाताई मुंडे आज दिल्ली दौर्यावर होत्या. दुपारी त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या कार्यालयास जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे जीवन चरित्र ‘श्रीमानयोगी’ भेट स्वरूपात दिले. अर्थात, छत्रपती शिवराय आपल्यासाठी आपला अभिमान आहेत आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचे मार्गदर्शकही आहेत असं त्यांनी म्हटलं. यावेळी
सन्माननीय मंत्री महोदयांनी महाराष्ट्रामधील सर्व विषयांवर संपूर्ण सहयोग करण्याचे आश्वासन या प्रसंगी दिले असल्याचे ना. पंकजाताईंनी म्हटलं आहे.