बीड पोलिसांच्या विशेष पथकाने सुदर्शन घुले आणि सुधीर आंधळे नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपासासाठी आरोपींना सीआयडीकडे सोपवण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक यांनी दिली आहे
बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपींपैकी दोघे बीड् पोलिस यांच्या हाती लागले आहेत. सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि सुधीर सांगळे या दोघांनाही अटक केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य भरातून सर्व आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे. यातील चार आरोपी अटक झाले होते, तर प्रमुख आरोपी सुदर्शन घुले सह तिघे आतापर्यंत फरार होते. काल रात्री उशिरा बीड् पोलिसांनी यातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना पुण्याजवळ ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.एलसीबीचे महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे.