बीड -बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. त्याने जिल्हा ढवळून निघाला. या खूनाला १६ दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकाटच आहेत. बीड पोलीसांवर अगोदरच आरोपींना पाठीशी घालण्याचा आरोप होत आहे. तर सीआयडी सुद्धा आरोपींचा माग काढण्यास सपशेल अपयशी ठरल्याचे दिसते. त्यावरून विरोधक आता आक्रमक झाले आहे. शनिवारी याविरोधात विरोधक मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार सहभागी होणार असल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली.