बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी कडक अॅक्शन घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यात कारवयांना सुरूवात झाली आहे. एकाच दिवसात 63 अवैध धंद्यांवर कारवाईचा हातोडा उगारण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी जिल्ह्यातील ठाण्यांमध्ये 65 गुन्हे दाखल झाली आहेत.
दि. 21 डिसेंबर 2024 रोजी नुतन पोलीस आधिक्षक नवनीत काँवत यांनी पोलीस आधिक्षक पदाचा कार्यभार स्विकारला आहे. कार्यभार स्विकारल्यापासुन अधिपत्त्याखालील सर्व आधिकार्याचे मॅरेथॉन बैठका घेवुन, अधिपत्त्याखालील अधिकार्यांना मार्गदर्शन करुन बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाट्न करण्याबाबत कठोर सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार 23 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील एकुण 28 पोलीस ठाण्याअंतर्गत जुगार खेळणार्या व खेळविणार्या एकुण 34 ईसमांवर जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये एकुण 27 गुन्हे दाखल करण्यात आले असून एकुण 87,440 रु. (सत्याऐंशी हजार चारशे चाळीस) रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील अवैध दारुविक्री बंद करण्यासाठी अवैध दारु ठिकाणावर जिल्ह्यातील 28 पोलीस ठाणे अंतर्गत एकुण 36 ईसमांवर मुंबई दारुबंदी अधिनियम अंतर्गत 36 गुन्हे दाखल करण्यात आले असुन त्यामध्ये एकुण 2,50,055 (दोन लाख पन्नास हजार पंचावन्न) रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच बीड शहरामध्ये सिगारेट व अन्य तंबाखु जन्य उत्पादने जाहिरात, मनाई आणि व्यापार व वाणिज्य आणि वितरण नियम कायद्याप्रमाणे दोन गुन्हे दाखल करुन 1755 (सतराशे पंचावन्न) रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जिल्ह्यात शहर वाहतुक शाखेमार्फत मोटार वाहन अधिनियमाअंतर्गत 186 केसेस करुन 1,50,400/- (एक लाख पंन्नास हजार चारशे) रुपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे. अशा प्रकारे नुतन पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या या मोहिमेला दररोज मोठा प्रतिसाद मिळणार आहे.