बीड

जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी मी 24 तास तत्पर – एसपी नवनीत कॉंवत, जिल्ह्यातील प्रत्येकाला सुरक्षीत वाटले पाहिजे असेच काम करणार, कायदा मोडणार्‍यांवर कडक कारवाई करणार, जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही, संरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमधील फरार आरोपींना लवकरच गजाआड करणार, प्रकरणाची सखोल चौकशी करणार, पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून एसपींनी घेतला जिल्ह्याचा आढावा तर उद्या बीड जिल्ह्यातील ठाणेदारांची घेणार बैठक, खोटे गुन्हे दाखल करणार्‍यांवरही राहणार करडी नजर


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : बीड पोलिस अधीक्षक म्हणून आयपीएस नवनीत कॉंवत यांची शनिवारी नियुक्ती केली आहे. त्यानुसार नवनीत कॉवत यांनी शनिवारी रात्री पावणे आकरा वाजता पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारून कामाला सुरूवात केली आहे. रविवारी सकाळी त्यांनी पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेवून जिल्ह्याचा आढावा घेत त्यांना अनेक सुचनाही केल्या आहेत. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भुमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी मी 24 तास तत्पर राहणार असून प्रत्येकाला सुरक्षीत वाटले पाहिजे असेच काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखविले आहे. त्याअनुषंगाने ते उद्या जिल्ह्यातील ठाणेदारांची बैठक घेवून त्यांनाही पुढील कामासंदर्भात अनेक सुचना देणार आहेत.
नवनीत कॉंवत यांनी यापुर्वी लोणावळा येथे डीवायएसपी, धाराशिव येथे अप्पर पोलिस अधीक्षक तर छ.संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त म्हणून कर्तव्य बजावलेले आहे. पोलिस अधीक्षक म्हणून त्यांची बीड जिल्ह्यातील ही पहिलीच पोस्टींग आहे. त्यानुसार त्यांनी पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारून कामाला प्रत्यक्ष सुरवात केली आहे. रविवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भुमिका स्पष्ट केली आहे. जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी मी 24 तास तत्पर राहणार असून जिल्ह्यातील प्रत्येकाला सुरक्षीत वाटले पाहिजे असेच काम करणार असल्याचा विश्‍वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला आहे. तसेच कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे सर्वांनी नियमाचे, कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. कायदा मोडणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही, संरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमधील फरार आरोपींना लवकरच गजाआड केले जाईल, विशेष म्हणजे याप्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, आरोपींना कडक शिक्षा होईल त्याअनुषंगाने पुरावे गोळा केले जातील, असाही विश्‍वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला आहे. याअनुषंगानेच त्यांनी रविवारी सकाळी पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून बीड जिल्ह्याचा आढावा घेत त्यांना सुचना केल्या आहेत. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी विश्‍वाभंर गोल्डे, उमेश कस्तूरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख, शितलकुमार बल्लाळ, मारूती खेडकर, शिवाजी बंटेवाड, अशोक मोदीराज, श्री. गात, डीएसबीचे कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती. तर उद्या एसपी बीड जिल्ह्यातील ठाणेदारांची बैठक घेवून त्यांना चोख कर्तव्य बजावण्याच्या सुचना करणार आहेत.

खोटे गुन्हे दाखल करणार्‍यांवरही
राहणार करडी नजर
बीड जिल्ह्यात अनेक जण खोटे गुन्हे दाखल करून गोरगरिबांना त्रास देण्याचे काम करत आहेत. अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करणार्‍यांवरही पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांची करडी नजर राहणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!