बीड

पंकजाताई मुंडे यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ, ताईंनी शपथ घेताच बीड जिल्ह्यात फुटले फटाके, कार्यकर्त्यांचा उत्साह गगनाला


नागपूर, नागपूर येथे महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे, या मंत्रिमंडळात पंकजाताई मुंडे यांची वर्णी लागली असून त्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथही घेतली आहे, ताईंनी मंत्रीपदाची शपथ घेताच बीडमध्ये भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला जात आहे, पंकजाताईंच्या शपथविधी वेळी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आई प्रज्ञाताई मुंडे, बहिण माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, ॲड यशःश्री मुंडे, मुलगा आर्यमन पालवे, गौरव खाडे, चि. अगस्त्य खाडे आदी कुटुंबातील सदस्य तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!