बीड

धसांची तयारी झाली पक्की, आष्टीतून आमदारकी मिळणार नक्की, बेरोजगारीला आळा घालण्यासाठी आखले परफेक्ट नियोजन, आष्टीत लवकरच उभा राहणार टोलेजंग एमआयडीसी, 107 एकरवर एमआयडीसीचे सर्वेक्षण करण्यासाठी धसांनीच पुढाकार घेवून निविदा काढल्या, रोजगाराच्या जागतीक कंपन्या आष्टीत आणणार, पंकजाताईंच्याच हस्ते होणार एमआयडीसीचे थाटात उद्घाटन


बीड, दि.18 (लोकाशा न्युज) ः सुरेश धस जनतेच्या कल्याणासाठी लढणारे नेते आहेत, प्रत्येक कामात त्यांचे परफेक्ट नियोजन असते, त्यांच्या या परफेक्ट नियोजनामुळे आता आष्टी मतदार संघातील बेरोजगारीला लवकरच आळा बसणार आहे. कारण येणार्‍या काळात धस आष्टीत टोलेजंग एमआयडीसी उभारणार आहेत. त्याअनुषंगाने 107 एकरवर एमआयडीसीचे सर्वेक्षण करण्यासाठी धसांची पुढाकार घेवून निविदा काढलेल्या आहेत. रोजगारासाठी जागतिक कंपन्या या ठिकाणी आणण्याचा त्यांचा मानस आहे, विशेष म्हणजे या एमआयडीसचे उद्घाटन लोकनेत्या पंकजाताईंच्या हस्ते होणार आहे.
आष्टी-शिरूर-पाटोदा येथे बेरोजगारी आणि स्थलांतराचे प्रश्न भेडसावत असल्याचे वास्तव आहे. असंख्य तरुण मुलं-मुली आपल्या कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी अनेक महिने आणि वर्षानुवर्षे आपल्या कुटुंंबापासून दूर मुंबई, पुणे आणि अहिल्यानगरमध्ये स्थलांतरित होतात. आष्टी-पाटोदा-शिरूर येथील जनतेच्या सेवेसाठी मी माझे जीवन समर्पित केले आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मी आणि माझ्या कुटुंबाने वर्षानुवर्षे रात्रंदिवस कठोर परिश्रम केले आहेत, आमच्या सार्वजनिक सेवेच्या दीर्घ ओळीच्या भावनेने मला येथे महत्त्वाची घोषणा करायची आहे. मी आमदार झालो त्या दिवसापासून, मी महाराष्ट्र्याच्या मुख्यमंत्र्यांना व औद्योगिक विकास मंत्र्यांना व औद्योगिक विकास महामंडळाच्या सीईओला अनेक पत्रे लिहिली आहेत आणि बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी येथे 5 स्टार, मोठी एमआयडीसी मिळवण्यासाठी अनेक नेत्यांना भेटलो आहे. श्रीमती पंकजाताईंच्या विश्वासाने मला हे सांगताना अभिमान वाटतो की आमची मागणी पूर्ण झाली आहे आणि आष्टी येथील 107 एकरवर एमआयडीसीचे सर्वेक्षण करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. तुम्ही फक्त मला विधानसभेत पाठवा या मी एमआयडीसीचे भव्य उद्घाटन नामदार श्रीमती.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करणार आहे, आमच्या मुलांना रोजगार देण्यासाठी जागतिक दर्जाच्या कंपन्या तेथे आणण्याची जबाबदारी माझी असेल, असा शब्दही मी याठिकाणी देतो, असे वचन सुरेश धसांनी केले दिले.

मंत्री पदाच्या माध्यमातून
बीडसह महाराष्ट्राचे केले कल्याण
सुरेश धस राज्यमंत्री असताना त्यांच्याकडे आठ खात्यांचा कारभार होता, याच पदाच्या माध्यमातून त्यांनी आष्टी, बीडसह संपूर्ण महाराष्ट्राचे कल्याणच केलेले आहे. महसूल राज्य मंत्री असताना त्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर वाटणी पत्राचा निर्णय घेतला, त्यांचा हा निर्णय फक्त बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी कल्याणकारी ठरलेला आहे. तसेच शेतकर्‍यांसाठी सुरेश धस यांनी पावलोपावली मोठे काम केलेले आहे, मग छावण्या असोत की जलसिंचन विहिरींचा विषय. रोहियो राज्यमंत्री असताना त्यांनी शेतकर्‍यांच्या विहिरीचे अनुदान 90 हजारावरून थेट तीन लाखापर्यंत केले, धस यांच्या या एका निर्णयामुळे बीडसह संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक कल्याणच झालेले आहे. त्यांच्यातील या कर्तृत्वामुळे त्यांना पुन्हा एखदा विधानसभेवर पाठविणे आवश्यक आहे. महायुतीच्या सत्तेत त्यांना पुन्हा मंत्री पदाची लॉटरी लागू शकते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!