बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : उद्या दि. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. याचअनुषंगाने महिणाभरात बीड विधानसभेचे राजकारण चांगलेच तापल्याचे पहायला मिळाले. याच तापलेल्या वातावरणात विरोधकांची हवा पुर्णपणे गुल झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणूकीत बीड मतदार संघात डॉ. योगेश भैय्याच पॉवरफुल ठरलेले आहेत. जनविकासासाठी सदैव सर्वात पुढे असणार्या डॉ. क्षीरसागरांवर बीडकरांकडून विजयाचा शिक्कामोर्तब केला जात आहे. कारण त्यांच्या विजयासाठी बीड मतदारांनीच ही निवडणूक आपल्या हाती घेतली असून ते मोठ्या मताधिक्यांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
बीड मतदार संघावर नेहमीच क्षीरसागर कुटूंबियांची सत्ता राहिलेली आहे, स्व. केशरकाकू क्षीरसागर यांनी स्वच्छ प्रतिमा ठेवून राजकारण केले, समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे जीवन घडविले, आपल्या याच कामामुळे त्या संपूर्ण जिल्हावासियांसमोर एक आदर्श नेता परिचित झाल्या, त्यांच्यानंतर काकूंचा वसा आणि वारसा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांनी सक्षमपणे चालविला, मंत्री पदाच्या माध्यमातून जयदत्त क्षीरसागरांनी बीड मतदार संघात कोट्यावधींचा निधी आणून इथले छोटे मोठे प्रश्न सोडविण्याचे काम केले, तसेच त्यांच्याच खांद्याला खांदा लावून डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांनीही आदर्शच काम केले. विशेष म्हणजे भारतभुषण क्षीरसागरांनी राबविलेल्या वेगवेगळ्या योजना बीडकरांसाठी खर्या अर्थाने तारणहारच ठरलेल्या आहेत, आता एक कर्तृत्वान म्हणूनच काकूंचा वसा आणि वारसा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याकडे सोपविलेला आहे. डॉ. योगेश क्षीरसागर हे अत्यंत प्रमाणिक आणि जनतेला न्याय देणारेच आहेत. त्यांच्या याच कलागुणांमुळे स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना विधानसभेत घेण्याचा चंग बांधलेला आहे. त्यानुसार योगेश भैय्या सध्या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. बीड मतदार संघाच्या आखाड्यात अनेक उमेदवार असले तरी इथे फक्त डॉ.योगेश क्षीरसागरांचाच बोलबोला ऐकायला मिळालेला आहे, त्यांच्या पाठीशी ना. धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांनीही आपली शक्ती लावलेली आहे. त्याचप्रमाणे डॉ. क्षीरसागर पावलोपावली बेरजेचे राजकारण करत ते जनतेसमोर गेलेले आहेत. विरोधकांना टिका करता येईल असा एकही मुद्दा त्यांनी सोडलेला नाही, त्यामुळेच त्यांना गावागावातून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. मतदानापुर्वीच त्यांना मोठी लोकप्रियता मिळत आहे. परिणामी याच वातावरणात विरोधकांची हवा पुर्णपणे गुल झाली असून डॉ. योगेश भैय्याच खरे पॉवरफुल असल्याचे पहायला मिळत आहे. जनविकासासाठी सदैव पुढे असणार्या डॉ. क्षीरसागरांवर बीडकरांकडून विजयाचा शिक्कामोर्तब केला जात आहे. कारण डॉ. क्षीरसागरांच्या विजयासाठी मतदारांनीच विधानसभेची ही निवडणूक हाती घेतली असून या निवडणूकीत डॉ. क्षीरसागरांचा मोठा मताधिक्यांनी विजय होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
सारिकाताईंमध्ये मतदारांना
दिसू लागली काकूंची छबी
डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासारखा प्रमाणिक आणि कर्तृत्वान नेता मिळायलाही खर्या अर्थाने भाग्यच लागते, हेच भाग्य आता बीडकरांना मिळालेले आहे. वास्तविकत: डॉ. क्षीरसागरांना विजयी करण्यासाठी त्यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागरांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढलेला आहे. अगदी काकूंप्रमाणेच डॉ. सारिकाताईंही जनतेच्या मदतीसाठी धावून जातात, त्यामुळेच बीड मतदार संघातील मतदारांना डॉ. सारिकाताईंमध्ये स्व.केशरकाकूंचीच खर्या अर्थाने छबी दिसत आहे.