बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणच्या सभांंना प्रचंड गर्दी होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, शिवसेना, रिपाइंसह मित्र पक्षाच्या पदाधिकार्यांनी प्रचारात झोकून दिल्याने अनेक कॉर्नर बैठका, रॅली, प्रचार सभांना गर्दी होत होती. त्यामुळे विरोधकांना धडकी भरल्याचे चित्र बीड विधानसभा मतदारसंघात निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता डॉ. योगेश क्षीरसागर विधानसभेचे मैदान जिंकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जिथे जाईल तिथे त्यांच्या घड्याळाचा गजर आहे. त्यामुळेच विजयश्री खेचून डॉ. योगेश बीड मतदार संघाचा चेहरा मोहरा खर्या अर्थाने बदलणार आहेत.
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गेल्या वर्षभरापासून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यामुळे बूथवर सक्षम यंत्रणा उभारण्यात त्यांना यश आले आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मतदारसंघातील ग्रामीण भागाचा निवडणुकीच्या दौरा केला होता. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागाचा प्रचार वेळेत पूर्ण करून शहरात लक्ष घातले होते. त्यांच्या प्रचाराची धुरा मित्र पक्षाच्या पदाधिकार्यांनी मोठ्या ताकदीने सांभाळली. प्रत्येक मित्र पक्षाने मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे भरगच्च मेळावे घेतले. प्रचाराच्या पूर्वसंध्येला भाजपच्या पदाधिकार्यांनी मांजरसुंबा (ता.बीड) येथे मेळावा घेतला. यावेळी ऊसतोड कामगार, बालाघाटवरील जनतेचे प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरातील गांधीनगर, मोमीनपुरा भागात प्रचंड सभा झाल्या. या दोन्ही सभांमुळे अल्पसंख्याक समाजाला गृहीत धरणार्यांचे टेन्शन वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते. तिकडे शहरात पेठ बीड भागात रिपाइंचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी मतदारसंघाचा मेळावा घेतला. तसेच, शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी महायुती धर्म पाळत युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये प्रचंड गर्दीचा मेळावा पार पाडला. डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पेठ बीड भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या गर्दीच्या प्रचार मेळावे, सभांमधून महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या घड्याळाचा गजर सर्वत्र होताना दिसून येत आहे.
मतदार संघाला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर
आणण्यासाठी मला सेवेची एक संधी द्यावी – डॉ. क्षीरसागर
दुर्दैवाने जात-पात, धर्माच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली जात आहे. आपण कायम विकासाच्या मुद्द्यावर काम करत आलो. त्यामुळे बीडच्या सुज्ञ जनतेने मतदान करताना माझा विचार जरूर करावा. मतदारसंघाला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी मला सेवेची एक संधी द्यावी, असे आवाहन महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.