बीड

सेवेकरी, लखफ लोकनेत्याची..! दिवस असो की रात्र 24 तास जनतेच्याच सेवेत मग्न, कामगिरी दमदार म्हणूनच आष्टीकरांना पुन्हा पाहिजेत सुरेश धसच आमदार


बीड, दि. 17
नेता जनतेसाठी लढणारा असेल तर जनता सुखी समाधानाने आपले जीवन जगत असते, अगदी याच सूत्रावर माजी मंत्री सुरेश धस हे आष्टी मतदार संघात धडाडीने काम करत आहेत, आष्टी मतदार संघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते आपल्या जीवाचे रान करत आहेत, दिवस असो की रात्र ते 24 तास आष्टी मतदार संघातील जनतेच्या सेवेत असतात, याच मतदार संघात त्यांनी कोट्यवधीचा निधी आणून आष्टीला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. त्यामुळेच त्याच्यात एक लोकनेत्याची लखफ पाहायला मिळते, त्यांची कामगिरी दमदार, म्हणूनच आष्टीकरांना पुन्हा पाहिजेत सुरेश धसच आमदार..!, असा बोलबालाही पूर्ण मतदार संघातून सद्या ऐकायला मिळत आहे.
आष्टी मतदार संघातील नागरिकांना नेहमीच दुष्काळासारख्या समस्येला तोंड द्यावे लागते, आष्टी, पाटोदा आणि शिरूर अशी तीन तालुके या मतदार संघात येतात, जिल्ह्यात हा मतदार संघ सर्वात मोठा आहे, या मतदार संघातील लोकांना नेहमीच छोट्या मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते, सातत्याने संकटात, अडचणीत येणाऱ्या याच मतदार संघाला माजी मंत्री सुरेश धस यांच्या रूपाने एक खंबीर, ताकतीने लढणारे आणि दिलदार असं नेतृत्व मिळालेले आहे, राजकारण नव्हे तर फक्त समाजकारण आपल्या डोळ्यासमोर ठेऊन सुरेश धस मतदार संघात काम करत आहेत, दिवस असो की रात्र ते या मतदार संघातील लोकांच्या कामात २४ तास मग्न असतात, कुंटेफळ सारख्या महत्वाच्या प्रकल्पाचे काम त्यांच्या हाताने मार्गी लागलेले आहे, हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी मोठे वरदानच ठरणार आहे, ते कल्याणकारी योजना डोक्यात ठेवून काम करणारे लोकनेते आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन या मतदार संघातील अनेक तलावांचा गाळ काढलेला आहे, याचा फायदा आज अनेक शेतकऱ्यांना होत आहे, जनतेच्या कामात ते सर्वात पुढे असतात, मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावरही त्यांनी सातत्याने आवाज उठवलेला आहे, या लढ्यात ते अनेकदा रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांनी एखाद्या प्रश्नावर आवाज उठवला की त्याची शासन आणि प्रशासनाला दखलच घ्यावी लागते, एवढी छाप त्यांनी आपल्या कामातून निर्माण केलेली आहे, कोरोणा सारख्या भयानक संकटात त्यांनी आपल्या जीवाची थोडीही काळजी केलेली नाही, ते दिवस रात्र आष्टी मतदार संघातील लोकांच्या सेवेत दिसले, एक सुरेश धस काय करू शकतो हे यावेळी त्यांनी संपूर्ण राज्याला खऱ्या अर्थाने दाखवून दिले, या काळात त्यांनी मतदार संघातील लोकांसाठी दिवस रात्र काम केले, गोर गरीबांच्या अडीअडचणी सोडवताना ते त्यावेळी सरकार आणि प्रशासनाच्या थेट अंगावर पण गेले, यामुळे कोरोनात गोर गरिबांवर लावलेले निर्बंध प्रशासनाला तत्काळ रद्द करावे लागले, ३३ कोविड सेंटरच्या माध्यमातून संपूर्ण आष्टी मतदार संघाची सेवा केली, गोरगरिबांना वैद्यकीय, मूलभूत सेवा पुरवल्या, स्वखर्चाने ये जा करण्यासाठी वाहने उपलब्ध करून दिली, समय सूचकता काय असते हेच यावेळी सुरेश धस यांनी अख्ख्या मंत्रिमंडळाला आणि जिल्ह्याच्या प्रशासनाला खऱ्या अर्थाने दाखवून दिले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आरोग्यात जसे काम आहे अगदी तसेच काम सुरेश धस यांचे आहे, धस हे प्रत्येक कामाचे परफेक्ट नियोजन करणारे लोकनेते आहेत, ते प्रत्येकाला न्याय देणारे आहेत, त्यामुळे ज्यावेळी ते विधिमंडळात बोलायला उभा राहतात त्यावेळी ते अनेकांना घाम फोडून सोडतात, गल्ली पासून दिल्ली पर्यंत त्यांच्या नेतृत्वाचा बोलबाला आहे, त्यांनी तीन वेळा विधान सभेत, एक वेळा विधान परिषदेवर काम केलेले आहे, विशेष म्हणजे आठ खात्यांचा राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी धडाकेबाज काम केलेले आहे, या काळातील त्यांची कारकीर्द खरोखरच आदर्श ठरलेली आहे, त्यांच्या याच आदर्श कामातून संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्यात लोकनेते आर.आर. पाटील यांची लखफ पाहिलेली आहे, आपल्या आष्टी मतदार संघासाठी ते खरोखरच एक सेवेकरी असून सत्ता असो अथवा नसो त्यांची ही सेवा अविरतपणे सुरूच राहणार आहे, त्यामुळे या लोकनेत्याला पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यांनी आष्टीकरांना राज्याच्या विधान सभेत पाठवावेच लागणार आहे, त्यांचे योगदान आष्टीकरांनी विसरून चालणार नाही, कारण त्यांची कामगिरी खरोखरच आहे दमदार म्हणून पुन्हा पुन्हा आष्टीचे सुरेश धसच पाहिजेत आमदार..!, कारण सुरेश धस मतदार संघाला तरणारे नेते आहेत, त्यामुळेच त्यांना या निवडणुकीत गावागावातून मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.

शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर वाटनी पत्राचा निर्णय ठरला कल्याणकारी
महसूल राज्य मंत्री असताना त्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर वाटणी पत्राचा निर्णय घेतला, त्यांचा हा निर्णय फक्त बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी कल्याणकारी ठरलेला आहे.

सुरेश धस यांनीच शेतकऱ्यांच्या विहिरीचे अनुदान ९० हजारावरून तीन लाख केले
शेतकऱ्यांसाठी सुरेश धस यांनी पावलोपावली मोठे काम केलेले आहे, मग छावण्या असोत की जलसिंचन विहिरींचा विषय. रोहियो राज्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या विहिरीचे अनुदान ९० हजारावरून थेट तीन लाखापर्यंत केले, धस यांच्या या एका निर्णयामुळे बीडसह संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक कल्याणच झालेले आहे.

मिळालेल्या संधीचे धसानी सोनेच केले
सुरेश धस यांनी मिळालेल्या संधीचे सोनेच केलेले आहे, शासनाची जबाबदारी काय आहे, यातून जनतेला न्याय कसा द्यायचा याचे पूर्ण नॉलेज त्यांच्याकडे आहे, त्यामुळेच ते मिळालेल्या मंत्री पदाला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकलेले आहेत.

संकटांना थेट भिडणारा लोकनेता
सुरेश धस यांचे एक एक काम खरोखरच प्रत्येकाच्या आठवणीत ठेवणारेच आहे, केदारनाथ, बद्रीनाथ याठिकाणी आलेल्या जलप्रलयात देशातील लाखो भाविक अडकले होते, याचवेळी मदत व पुनर्वसन राज्य मंत्री म्हणून सुरेश धस हे राज्यात काम पाहत होते, याच जल प्रलयात राज्यातीलही भाविक अडकले होते, याच भाविकांच्या मदतीसाठी स्वतः मंत्री सुरेश धस धाऊन गेले होते, त्यांच्या याच मदतीवरून संकटांनाही थेट भिडणारा लोकनेता म्हणूनही धस यांच्याकडे पाहिले जाते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!