आष्टी (प्रतिनिधी)
मतदारसंघातील जनता आणि सुरेश धस हे एक समीकरण आहे.अडचण म्हटले की आपोआप धसांचे नाव सर्व सामान्य जनतेच्या ओठावर येते.याच जोरावर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करून जनतेच्या मनात घर तयार केलेल्या सुरेश धस याचाच बोलबाला असल्याचे दिसुन येत आहे.
२३१ आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी,शिवसेना,रिपाई (आठवले गट) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश रामचंद्र धस याचे चिन्ह कमळ आहे.सुरेश धस गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघात विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.याच जोरावर तीन वेळा आमदार, तर एक वेळी राज्यमंत्री असताना मतदारसंघात विकासाची गंगा आणली,सर्व सामान्य जनतेच्या गैरसोयी दुर करून सोयीसुविधाचा लाभ दिला.शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडीकीने शासन दरबारी मांडून न्याय देण्याचे काम केले. आणि आता चौथ्यांदा ते आमदरकीच्या रिंगणात उतरले असून मोठ्या प्रमाणात गोरगरीब, वंचित, शेतकरी,दीन दुबळ्या,भटक्या समाजातील लोकांच्या आशिर्वादाने ते निवडणूक लढवत आहेत.मतदारसंघात त्याना वाढता पाठिंबा मिळत असून शहर, गाव,वस्ती,वाडी,यासह ठिकठिकाणी त्याचा बोलबाला आहे.सर्व सामान्य मतदारांनी त्याचा विजयाचा विडा उचलला असून उद्या लोकप्रतिनिधीं म्हणून मोठ्या मताधिक्याने सुरेश धस याना विजयी करण्याचा संकल्प मतदारांनी केला आहे.