बीड (प्रतिनिधी)
दि.११ : बीड विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांना साथ देण्याचा एकमुखी निर्णय बागवान समाजाने बीड शहरात रविवारी (दि.१०) सायंकाळी झालेल्या बैठकीत घेतला आहे.
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बीड शहरातील बागवान समाजबांधवांशी संवाद साधला. येत्या २० तारखेला अनुक्रमांक ४ समोरील घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा. बीड विधानसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. बागवान समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. यावेळी बागवान समाज पंच कमेटी अध्यक्ष हाजी हाशम बागवान उपाध्यक्ष हाजी हारून बागवान, टिपू सुलतान युवा मंचाचे अध्यक्ष इरफान बागवान, हाजी मुसा बागवान, हाजी अब्दुल रौफ बागवान, नाहेद बागवान, आयुब बागमार, इंजि.इम्रान बागवान, हाजी जाफर बागवान, सोनू बागवान, फरहान बागवान यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.