सिरसाळा : परळी सह बीड जिल्ह्यात गुंडगिरी,दहशत माजवणा-यांना हद्दपार करा असे घणाघाती वक्तव्य करत शरद पवार यांनी परळीतील सभेत धंनजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब श्रीकिशन देशमुख यांच्या प्रचारार्थ परळीत भव्य जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पवार बोलत होते. पवार म्हणाले कि, परळी सह संबंध बीड जिल्ह्यात गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, व्यापारी हैराण झाले आहेत. दहशतिखाली वावरत आहेत. ज्यांना संकट काळात साथ दिली त्यांनी पक्ष फोडण्यासाठी पुढाकार घेतला असं म्हणत अशा लोकांना सत्तेतून हद्दपार करा अन राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा असे आवाहन खा. शरद पवार यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची परळी येथे जाहीर सभा झाली. या सभेला बीडचे खा बजरंग सोनवणे यांच्यासह खा. रजणीताई पाटील, माजी मंत्री फौजिया खान व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खा. पवार यांनी कृषिमंत्री तथा अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. या वेळी त्यांनी धंनजय मुंडे बाबत चा जुना प्रसंग सांगितला,ते म्हणाले कि काही वर्षांपूर्वी पंडित अण्णा मुंडे त्यांच्या मुलाला धनंजय ला घेऊन माझ्याकडे आले, आम्हाला तुमची मदत हवी आहे असं म्हटले, त्यांना संकट काळात मी मदत करण्याचा शब्द दिला. त्यांना विधानपरिषद मध्ये संधी दिली.विरोधीपक्ष नेतेपद दिले, त्यानंतर मंत्रिमंडळात संधी दिली. मात्र काही वर्षपूर्वी त्यांनीच आमचा पक्ष फोडला. धोका दिला, धंनजय मुंडे गद्दार निघाले असं म्हणत या गद्दारांना सत्तेतून हद्दपार करा असेही आवाहन पवार यांनी केले.बीड जिल्ह्यात विशेषत परळी मध्ये गुंडगिरी खूप वाढली आहे. इथले व्यापारी दहशतिखाली गाव सोडून गेले आहेत. ही गुंडगिरी संपवण्याचे काम तुमच्या हातात आहे. या गुंडाना पोसणाऱ्या लोकांना पराभूत करा असे आवाहन त्यांनी केले. सभेस प्रचंड लोक उपस्थित होते.
● ह्या मुद्द्यावरुन गाजली सभा
: शरद पवार यांच्या भाषणा पुर्वी सुनील गुट्टे ,अजय बुरांडे, वैद्यनाथ देवल समितीचे अध्यक्ष राजेश देशमुख, उमेदवार राजेसाहेब देशमुख, फौजिया खान,खासदार रजणीताई पाटील, खासदार बजरंग सोनवणे, उत्तम माने,प्रभाकर वाघमोडे ,माधव जाधव यांची भाषणे झाली . परळीतील वाढती गुंडगिरी,अराजकता,दहशत, सुशिक्षित बेरोजगार युवक, शेतकऱ्यांच्या आत्महत्या,परळीत व्यावसायिक एजेन्सी ,शिक्षण, भ्रष्टाचार , महागाई, कर्ज माफी या विषयावर सभा वरिल उपस्थित पक्ष पदाधिकाऱ्यांनी गाजवली .
● भाजप महायुती सरकारने धनगर समाजाशी धोका केला : भूषणसिंह होळकर
- : परळी येथील महाविकास आघाडी च्या सभेत होळकर घराण्याचे वंशज भूषण सिंह उपस्थित होते , ते आपल्या भाषणात बोलतांना म्हणाले कि,भाजप महायुती सरकारने युवकांना रोजगार दिला नाही, धनगर समाजाला मागणीनुसार चे आरक्षण दिले नाही, पंधरा लाख दिले नाही, शेतकऱ्यांना हमी भाव दिला नाही,शेतीची अवस्था भयानक दैनिय आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या त्या कुटुंबातील लोकांना कृषी मंत्र्यांनी कधी भेटी दिल्या का ? तीन कारखाने पण एकही चालवला नाही, केवळ लोकांची दिशा भूल केली.धनगरांची तर ह्या सरकारने शेळी- मेंढी महामंडळ बाबत घोर फसवणूक केली आहे. महाविकास आगाडीचे चे सरकार आले तर महिलांना ३ हजार,शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ, आरोग्य विमा,जातीनिहाय जनगणना केली जाईल, ज्यांना पवार साहेबांनी मंत्री केलं त्यांनी पवार साहेबांशी धोक करत साहेबांना सोडलं तर ते सामान्य जनतेचा काय होतील ? असा टोला नाव न घेता धंनजय मुंडे यांना लगावला आहे.महायुतीच्या पायाखालील वाळू सरकली आहे. असही होळकर म्हणाले