बीड

करुणा मुंडेंचा परळी विधानसभेतील उमेदवारी अर्ज बाद…

परळी विधानसभा मतदारसंघातून करुणा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून ज्या व्यक्तीचे नाव होते, त्याने अर्जावरील स्वाक्षरी आपली नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले म्हणून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला.
परळी विधानसभा मतदारसंघात 10 उमेदवारांचे 15 अर्ज बाद ठरले आहेत. करुणा मुंडे यांनी आपल्या स्वराज्य शक्ती सेना पक्षाकडून परळीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. करुणा मुंडे यांनी 2 आॅक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 47 विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच स्वतः परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली होती. दरम्यान, करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्जच बाद ठरवण्यात आला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!