बीड

अबब ! बस प्रवासात व्यापार्‍याचे लांबविले दोन कोटीचे सोन्याचे दागिने, नेकनूर ठाणे हद्दीतील घटना, बॅग चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद


नेकनूर, दि.7 (लोकाशा न्यूज) : नांदेड येथून मुंबईकडे बसने जात असलेल्या सराफा व्यापार्‍याचे प्रवासात दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी गेले आहेत. ही घटना नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील रविंद्र धाब्याजवळ घडली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
नेकनूर-मांजरसुंबा महामार्गावर रवींद्र धाब्यावर जेवण्यासाठी अनेक बस थांबतात. रात्री नांदेडहून मुंबईकडे निघालेली बस या धाब्यावर थांबली. या बसमध्ये मुंबई येथील सराफा व्यापारी रमेश जैन हे याच बसमध्ये होते. अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग तेथून लंपास केली. हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी तात्काळ नेकनूर पोलिसांशी संपर्क साधला. त्या बॅगमध्ये अडीच किलोपेक्षा अधिकचे सोने (ज्याची अंदाजे किंमत दोन ते सव्वा दोन कोटी) असल्याचा दावा संबंधित व्यक्तीने केला आहे. पोलीसांना संशय आल्याने त्यांनी आगोदर रविंद्र धाब्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्या व्यक्तीची बॅग अज्ञात व्यक्तीने पसार तर केली हे स्पष्ट झाले. मात्र त्या बॅगमध्ये दोन किलोपेक्षा अधिक सोने होतं का? यासह चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेने खळबळ उडाली असून नेकनूर पोलीसांनी माहिती घेत आहोत, चौकशी सुरु असल्याची माहिती दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!