बीड

झेडपीच्या आवारात तरुणाची आत्महत्या

!

बीड दि.६ (प्रतिनिधी) शहरातील जिल्हा परिषदेच्या आवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह रविवार (दि.६) रोजी सकाळी निदर्शनास आला आहे .

सविस्तर माहिती अशी कि, अर्जुन कवठेकर (रा.अंकुशनगर ता.बीड) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. बीड येथील महाराजा ट्रॅव्हल्सवर तो चालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्या कशामुळे केली, याचे कारण अस्पष्ट आहे. बीड शहर पोलीस ठाण्यातील बाळासाहेब सिरसट, अशपाक सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला असून बीड शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!