बीड

झेडपीच्या कारभारात पारदर्शकता येणार, प्रत्येक दिवशी झेडपीच्या तीन विभागांची होणार तपासणी, सीईओ आदित्य जिवने यांनी घेतली कडक अ‍ॅक्शन


बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : मागच्या आठ दिवसांपुर्वी आयएएस आदित्य जिवने यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी आपल्या कामाला सुरूवात केली आहे. आता प्रत्येक दिवशी जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या 29 विभागांपैकी तीन विभागांची तपासणी केली जाणार आहे. झेडपीचे काम पारदर्शक रहावे, यासाठी सीईओंनी कडक अ‍ॅक्शन घेतल्याचे यावरून दिसून येत आहे.
याबाबत काढलेल्या आदेशात प्रत्येक विभागाने आपल्याकडे असलेल्या योजना, मनुष्यबळाची संख्या, रिक्त पदाची माहिती प्रलंबित प्रस्ताव याबाबत छोटी बुकलेट पुस्तिका तयार करून  प्रोजेक्टरवर त्याची माहिती सादर करावयाची आहे. नियमानुसार जे प्रस्ताव आहेत ते निकाली का काढण्यात आले नाहीत? आणि न्यायालयीन प्रकरणांची स्थिती याबाबतही आढावा घेण्यात येणार आहे. प्रलंबित प्रकरणांमध्ये विनाकारण ठेवले असतील तर विभागप्रमुखावर कारवाई करण्यात येणार आहे. असेही या आदेशात म्हटले आहे. शुक्रवारी सीईओंनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी व अन्य एका विभागाचा आढावा घेतला आहे. सीईओंच्या या अ‍ॅक्शन मोडमुळे सर्व खातेप्रमुख कामाला लागले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!