बीड

बलभीम कॉलेजच्या मैदानावर आढळले ड्रोन

बीड- जिल्ह्यात आणि अर्ध्या राज्यभरात ड्रोन (Drone) प्रकरणामुळे खळबळ उडाली असताना बीडमध्ये (Beed) शनिवारी सकाळी बलभीम कॉलेजच्या (balbhim college) मैदानावर एक ड्रोन जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आले. हे ड्रोन लहान असून यात एक कॅमेरा आणि बॅटरी ही असल्याची प्राथमिक माहिती आहे.सध्या घटनास्थळी शहर पोलीस दाखल झाल्याचे कळते.
बीड जिल्ह्यात (Beed District) मागच्या काही महिन्यांपासून ड्रोनमुळे खळबळ उडाली आहे.अनेक ठिकाणी ड्रोनच्या अफवांमधून बेदम मारहाण झाल्याच्या ही घटना समोर आल्या.पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ड्रोनमुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट केले होते.मात्र हे ड्रोन कोणाचे ?कशासाठी उडतात ?याला परवानगी तर नाही मग रात्री दूरदूरपर्यत याला कोण ऑपरेट करते ? हे अद्याप समोर आले नव्हते.अशातच शनिवारी सकाळी बलभीम कॉलेजच्या मैदानावर एक लहान ड्रोन आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.सध्या घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली असून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ,मनोज परजने,अशापाक सय्यदसह इतर कर्मचारी दाखल झाल्याचे कळते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!