बीड

केजमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडीत मुलगी साडेपाच महिन्याची गर्भवती, केज ठाण्यात गुन्हा दाखल  


केज, दि. 20 (लोकाशा न्यूज) : पोटात दुखत असल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात गेलेली अल्पवयीन मुलगी ही साडे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा खळबळजनक प्रकार केज तालुक्यात घडला आहे. सदर पीडित मुलगी ही इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. तर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा अन्य कोणी नसुन तिच्या मामाचा मुलगाच आहे.
केज तालुक्यातील इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने दि. 15 सप्टेंबर रोजी तिची आई तिला केज येतील डॉ. चाळक यांच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेवून गेली होती. तिथे तिची सोनोग्राफी केल्या नंतर समजले की, ती अल्पवयीन मुलगी ही साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. त्या नंतर तिला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले. तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुन्हा तिची डॉ. स्मिता शेंडगे यांच्या अर्णव डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी केली असता ती साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा रिपोर्ट घेवून ती अल्पवयीन मुलगी ही तिच्या आई सोबत स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथील प्रसूती वॉर्डातील भरती झाली. त्या नंतर तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, मागील आठ महिन्यापासून शेजारच्या गावातील तिच्या मामाचा मुलगा हा तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर त्याने बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. या प्रकरणी अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून दि. 19 सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात पीडितेच्या मामाच्या मुला विरुद्ध गु र नं 495/2024 भा दं. वि. 376 (1), 376 (2) (आय) (एन), 366 सह पोक्सो कलम 4, 5 (जे), (2), 6, 8, 12  लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने बलात्कार केल्याचा व बाल लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!