बीड

बीडच्या रॉकीला गृहमंत्र्याचे अभिवादन


एस.पी. हर्ष पोद्दार यांनी मानले आभार
लोकाशा वेब टीम
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन पोष्ट करून बीड जिल्हा पोलिसांचा साथी गमावल्याचे दुख शब्दबद्ध केले . अनिल देशमुख यांनी आपल्या पोष्ट मध्ये म्हटले आहे कि
अलविदा रॉकी! आमच्या बीड पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे काल दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली! दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त इ. विषयांच्या
खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा आम्ही रॉकीच्या जाण्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. रॉकीने केलेली कामगिरी माझ्यासह बीड पोलीस दलाच्या मनात सदैव घर करून राहील. संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलातील श्वानपथक महत्वाची भूमिका बजावत असते. महाराष्ट्र पोलीस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम करत आले आहेत. रॉकीने आजपर्यंत ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

…………….
एस पी हर्ष पोद्दार म्हणाले
” रॉकीच्या योगदानाची दखल घेतल्याबद्दल सन्माननीय गृहमंत्री मा.श्री.अनिल देशमुख साहेब यांचे बीड पोलीस दलाकडून धन्यवाद!
आपले शब्द आम्हा सर्व बीड पोलीसदलाला प्रोत्साहन देतात.”

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!