बीड

जिल्हा पोलिस दलातील १७ हवालदाराच्या खांद्यावर “स्टार’, सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती

प्रतिनिधी | बीड
जिल्हा पोलिस दलात कार्यरत १७ हवालदारांच्या खांद्यावर स्टार लागला. सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी पदोन्नती झाली. पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी याबाबत आदेश काढले.
पदोन्नती झालेल्या हवालदारांमध्ये हरिदास नागरगोजे, सुरेश जाधव, अनंत केंद्रे, बालाजी मुंडे, गोविंद कदम, दिगांबर चट्टे, बाळू चव्हाण, विष्णू सारुक, गोविंद बडे, आदिनाथ तांदळे, शत्रुघ्न शिंदे,LCB बीड मधील पी.टी.चव्हाण, लक्ष्मण टोले, वैजिनाथ नागरगोजे, परसराम मंजुळे, प्रेमचंद वंजारे व राजाभाऊ वंजारे यांचा समावेश आहे. पदोन्नतीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या हवालदारांच्या खांद्यावर स्टार लावला आणि त्यांचे स्वागत केले. एसपी, एएसपी, डीवायएसपी आणि पीआय यांनी पदोन्नतीनंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक झालेल्यांचे अभिनंदन केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!