परळी,
दि 28/08/2024 रोजी स्था.गु.शा.बीड येथील पोलीस हवालदार विष्णु सानप यांना गुप्त बातमी मिळाली की, बसवेश्वर कॉलनी परळी येथे इमस नामे रियाज रहीम शेख हा त्याचे राहते घरात व घराचे परिसरात बेकायदेशिर रित्या दुचाकी व चारचाकी वाहनास लागणारे बनावट ग्रीस तयार करत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळालेवरुन सदरची माहिती मा.श्री.उस्मान शेख, पो.नि.स्थागुशा यांना दिली. त्यानंतर दिनांक 28/8/2024 व दिनांक 29/8/2024 रोजी सदर कारवाई करणेकामी श्री. उस्मान शेख पो.नि.स्थागुशा स्वत: व आपल्या अधिपत्याखालील अंमलदार व पो.स्टे.परळी शहर येथील अधिकारी व अंमलदार यांचे तसेच पुरवठा विभागाचे श्री.सुरेश डोईजड व पंचासह परळी शहरातील बातमी ठिकाणी पोहचुन छापा टाकला असता एका घराचे शटरमध्ये एक इसम मिळुन आला त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव रियाज रहीम शेख वय 32 रा. बसवेश्वर कॉलनी बीड असे सांगितले त्यानंतर शटर व घराचे परिसरात वेगवेगळया खोलीमध्ये ऑईल व ग्रीस उत्पादने भरलेले बकेट व डब्बे दिसले सदरचे साहित्य वाहनाचे ग्रीस बनवण्यासाठी व पँकिग करण्यासाठी लागणारे साहित्य व कच्चे मेटरियल मिळुन आले त्यावरुन सदर इसमास नोटीस देवुन ग्रीस व आईल उत्पादनासाठी व पँकिगसाठी लागणारा परवाना व इतर आवश्यक कागदपत्रे दाखविण्यासाठी कळविले परंतु सदर इसमाने ग्रीस व आईल उत्पादनासाठी व पँकिगसाठी लागणारा परवानाचे कागदपत्र हजर केले नाही. तसेच जप्त मालामध्ये IMPALA premium AP-3 Grease चे डब्यांवर प्लॉट नं.02 वाळुंज एमआयडीसी औरंगाबाद, VISCO PLUS premium AP-3 Grease चे बकेटवर प्लॉट नं. 12, समता कॉलनी, परळी वैजनाथ जि.बीड व VISCO PLUS RPM 20-W-40 चा ऑईचे डब्यावर प्लॅाट नं.12 एमआयडीसी परळी जि.बीड असा उत्पादन, पॅकींग व विक्री साठीचा पत्ता असलेले बकेट व डब्बे मिळुन आले आहेत. वास्तविक लोकांना फसवणुक करुन बनावटीकरण करण्याचे उद्देशाने वरील पत्ते टाकुन सदर बनावट ग्रीस व ऑईलचे उत्पादन हे बसवेश्वर कॉलनी परळी वै. जि.बीड येथे राहते घरी करत असतांना सदर इसम मिळुन आलेला आहे.
आरोपी रियाज रहीम शेख रा.बसवेश्वर कॉलनी परळी यांचे ताब्यातुन बनावट ग्रीस व आईल तयार करण्यासाठी लागणारे ग्रीस, वेगवेगळया रंगाचे पावडर, केमीकल व काळसर तेलकट उग्र वास येत असलेले पदार्थ असे एकुण 7,82,085/- रु चे मुद्येमालासह बनावट ग्रीस व ऑईल हे त्याचे स्वत:चे घरात स्वयंपाक खोलीचे बाजुला तयार ठेवत असल्याने त्याने स्वत:च्या व इतरांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने ज्वलनीशिल पेट्रोलियम पदार्थ उत्पादन व साठवणुक करत असतांना साहित्यांसह मिळुन आल्याने त्याचे विरुध्द पो.स्टे.परळी शहर येथे कलम 318(4) भारतीय न्याय संहिता सह पेट्रोलियम पदार्थ कायदा 1934 चे कलम 23 व जिवनाश्यक वस्तु अधिनियम क .3,7 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक,बीड , मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री. उस्मान शेख स्था.गु.शा.बीड, पोह/विष्णु सानप,गणेश हांगे तसेच पो.स्टे.परळी शहर येथील सपोनि शिंदे, सपोनि गुट्टेवार, पोह/गिते, येलमटे, भताने व पुरवठा विभागाचे लिपिक श्री. सुरेश डोईजड यांनी मिळुन केलेली आहे.