बीड

महिला, मुलींवर अत्याचार करणार्‍या नराधमांना भर चौकात आणून शिक्षा दिली पाहिजे’, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केली भुमिका


बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : महिला, मुलींवर अत्याचार करणार्‍या नराधमांना भरचौकात आणून शिक्षा दिली पाहिजे’, असे मत राज्याच्या माजी मंत्री आ. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले आहे. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी ही भुमिका मांडली आहे. बदलापुर येथील चिमुकलीवर अत्याचार झालेले प्रकरण सरकारने जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला तात्काळ शिक्षा द्यावी, असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.
बदलापूर येथील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये दोन चिमुकल्यांवर सफाई कर्मचार्‍याने अत्याचार केले. मुलींनी दुसर्‍या दिवशी शाळेत जाण्यास नकार दिला, यानंतर मेडिकल तपासणी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. या घटनेचा निषेध व्यक्त करत महिलांनी शाळेच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि शाळेच्या निषेधार्थ आपला रोष व्यक्त केला. तर शाळेच्या प्रशासनावर प्रकरण दाबल्याचा आरोप आहे. 12 आणि 13 ऑगस्टला शाळेत साडे 3 वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाले. लघुशंकेसाठी जाताना सफाई कर्मचारी आरोपी 22 वर्षीय अक्षय शिंदेकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या धक्कादायक घटनेवर भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पत्रकार जेव्हा मला महिला अत्याचारांच्या घटनांबाबत प्रश्न विचारतात तेव्हा खूप वेदना होतात, अशा विषयावर कुठेही राजकीय भूमिका मांडणे अत्यंत चुकीचे आहे. महिला, मुलींवर अत्याचार करणार्‍या नराधमांना भरचौकात आणून शिक्षा दिली पाहिजे’, असे स्पष्ट मत मांडत पंकजाताई मुंडे यांनी बदलापूर येथील चिमुकलींवरील लैंगिक अत्याचार प्रकणावर बोलताना संताप व्यक्त केला. या प्रकरणावरील कारवाई होत असताना फास्ट ट्रॅक कोर्टात आता नराधमाना शिक्षा मिळेल, असा विश्वास व्यक्त करत पंकजाताई मुंडे यांनी असं वक्तव्य केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!