बीड

जिल्ह्यातील लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर, परळीत एसीबीचा ट्रॅप,सेवा सहकारी संस्थेचा सचिव पकडला

बीड दि. 22 : एक लाखाची लाच घेताना बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडळ अधिकारी सचिन सानप रंगेहाथ पकडला. या घटनेला 24 तासाचाही कालावधी उलटला नाही तोच गुरुवारी (दि.22) परळीमध्ये लाचखोर पकडला आहे. सलग दोन दिवस लाचखोरांवर कारवाई केल्याने जिल्ह्यातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

सेवा सहकारी संस्था वानटाकळी परळी सचिव बी.डी शिंगे व पवार असे लाचखोराचे नाव आहे. या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही कारवाई उस्मानाबाद एसीबीने केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!