बीड

एक लाखाची लाच घेताना मंडळ अधिकारी पकडला,बीडमधील कारवाईने जिल्ह्यात खळबळ


बीड दि.20 ः अवैधरित्या केलेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानप याने दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती दीड लाख रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले. यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.21) दुपारी बीड एसीबीने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरातील तहसील कार्यालयाजवळील एका हॉटेलात करण्यात आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने महसूल क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!