बीड

बिग बेक्रींग, अखेर स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला घोटाळेबाजांना बसला मोठा दणका, स्वामी विवेकानंदमधील सहा कोटीं दहा लाख रूपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी 27 जणांवर गुन्हे दाखल, शिक्षकांच्या उपोषणापुढे  प्रशासन नमले  



बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : अंबाजोगाई येथील स्वामी विवेकानंद शिक्षक पंतसंस्थेत गैरव्यवहार करणार्‍या घोटाळेबाजांना अखेर स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला मोठा दणका बसला आहे. सहा कोटी दहा लाखांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी तब्बल 27 घोटाळेबाजांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांच्या उपोषणापुढे प्रशासन नमले असून घोटाळेबाजांमध्ये आता मोठी खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई येथे स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था आहे. ही पतसंस्था जिल्हा बँकेला सलग्न आहे. या पतसंस्थेत संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मिळून सहा कोटी दहा लाख रूपयांचा अपहार केलेला आहे. त्यावर  सन 2012 ते 2017 या काळातील कारभाराचा सतिश काकासाहेब पोकळे यांच्या मार्फत फेरलेखापरिक्षण करण्यात आलेले आहे. 25 सप्टेंबर 2023 रोजी श्री. पोकळे यांनी सदर फेरलेखापरिक्षणाचा अहवाल दिलेला आहे. पतसंस्थेतील सहा कोटी दहा लाख रूपयांचा अपहार  अपहार झाल्याने घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल करा, असेही या अहवालात म्हटले होते, यानंतर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती, मात्र याच दरम्यान घोटाळेबाजांनी सहकार मंत्र्यांकडून या सर्व प्रक्रियेला स्थगिती आणली, सहकार मंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात शिक्षक भगवान पारोजी गडदे, सर्जेराव देवराव काशिद, संजीव कुरू उमाप, वैजनाथ हरीदास अंबाड, श्रीमती शैला गणपतराव जाधव आणि श्रीमती रेखा चंद्रकांत टाक यासर्वांनी मिळून हायकोर्टात धाव घेवून ती स्थगिती उठविली, तर सहकार आयुक्तांकडे पुन्हा घोटाळेबाजांनी सदर प्रक्रियेला स्थगिती आणण्याचा प्रयत्न चालू केला, घोटाळेबाजांची हीच धावपळ लक्षात घेवून याप्रकरणी सदर शिक्षकांनी अंबाजोगाईच्या सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर पाच ऑगस्टपासून उपोषण सुरू केलेे. घोटाळेबाजांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अशी मागणी सदर शिक्षकांनी लावून धरली, 13 ऑगस्ट रोजी  उपोषणाच्या नवव्या दिवशी तिघांची प्रकृती खालावली होती, वास्तविकत: सहकार आयुक्तांनीही 12 ऑगस्टच्या सुनावणीत घोटाळेबाजांचे बचावाचे सगळे प्रयत्न हाणून पाडले होते, त्यामुळे घोटाळेबाजांवर कारवाई होणारच हे निश्‍चित होते, मात्र जोपर्यंत घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असा पावित्रा सदर शिक्षकांनी घेतला होता, त्यामुळे सहा कोटी दहा लाखांचा गैरव्यवहार करणार्‍या 27 घोटाळेबाजांवर अबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शिवहर एकनाथ भताने, दादासाहेब नानासाहेब पवार, सुर्यकांत बाबूराव धायगुडे, अंगद कोंडीबा घुले, शर्मा लक्ष्मणराव गायकवाड, यशवंत सोपानराव भगत, गिरीधर दशरथ देशमुख, गंगाधर इरान्ना केलुरकर, हरिशचंद्र केशवराव चाटे, व्यंकटेश मुरलीधर गायकवाड, सुनिल प्रभाकर धपाटे, सुनिल भिमराव म्हेत्रे, प्रभावती तुकाराम अवचर, आशालता रविंद्र बोळे, पांडूरंग सोपानराव पांडे, मन्मथआप्पा शंकरअप्पा पोखरकर, प्रकाश नागनाथ विद्यागर, रामभाऊ विश्‍वनाथ भगत, संजय उत्तमराव वाघमारे, बाळकृष्ण ब्रम्हदेव चाटे, बी.व्ही. पौळ, के.बी. काळे, सी.आर. वाकडे, बी.डी. उघडे, आर. जी. देशमुख, व्ही. एम. धायगुडे, एस.एम. साळवे (सर्व रा. अंबाजोागाई) या घोटाळेबाजांचा समावेश आहे. यासर्वांवर  अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम 406, 409, 34 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकदंरीतच उपोषण करणार्‍या शिक्षकांपुढे प्रशासन नमले असून या गुन्ह्यामुळे आता घोटाळेबाजांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!