बीड

अखेर मिलियाच्या लफडेखोर आमेर काझीला बेड्या ठोकल्या, बीड शहर पोलिसांची कारवाई, काझीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

बीड -शहरातील मिलिया शाळेत महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेल्या आमेर काझी याला बीड शहर पोलिसांनी तब्ब्ल आठ महिन्यानंतर बिडमधून अटक केली आहे.

मिलिया शाळा आणि महाविद्यालय येथील महिलांचे अश्लील व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडिया तसेच पॉर्न साईटवर अपलोड केल्याप्रकरणी आमेर काझी या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

आमेर काझी याच्या काळ्या कारनाम्यावर माध्यमांनी प्रकाश टाकला होता. सुरवातीला मिलिया प्रशासनाने असे काही घडलेच नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र माध्यमांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने मुख्याध्यापक यांच्या तक्रारीवरून आमेर काझी याच्या विरुद्ध बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

डिसेंबर महिन्यात गुन्हा दाखल झाल्यापासून आमेर हा फरार होता. तो दुबई ला पळून गेल्याची चर्चा होती. दरम्यान शुक्रवारी आमेर बीडमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोनि शीतलकुमार बल्लाळ, परझने, अशफाक, शहनशा यांच्या पथकाने आमेर ला बेड्या ठोकल्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!