बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आहेत, कोणत्याही क्षणी या निवडणूकीची आचारसंहिता लागू शकते, त्याच अनुषंगाने सर्वच पक्ष आणि नेते मंडळी या निवडणूकीच्या तयारीला ताकतीने लागलेले आहेत. भाजप नेते रमेश आडसकर यांनीही विधानसभेच्या निवडणूकीसाठी पुन्हा एखदा हाबूक ठोकली आहे. माजलगावात परिवर्तनाची नांदी निर्माण झालेली आहे. जनता ताकतीने माझ्या पाठीशी आहे, यामुळे विजयाचा ठाम विश्वास असल्यामुळे माजलगाव विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा रमेश आडसकरांनी फेसबुक पोष्टव्दारे केली आहे. आडसकर पुन्हा एखदा विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
राजकारणात हाबाडा फेम म्हणून रमेश आडसकरांना ओळखले जाते, केज आणि माजलगाव मतदार संघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यांचे वडिल बाबूराव आडसकर यांनी आमदारकीच्या माध्यमातून बीडसह संपूर्ण महाराष्ट्राचे मैदान गाजवलेले आहे. याशिवाय गोरगरिबांच्या अडीअडचणीत ते तात्काळ धावून येणारे आहेत. त्यामुळेच त्यांच्यासोबत आजही मोठा जनसमुदाय आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही त्यांनी बीड जिल्ह्यात मोठे काम उभा केलेले आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. मागच्या विधानसभेच्या वेळी त्यांनी माजलगाव मतदार संघातून निवडणूक लढविली होती, या निवडणूकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता, मात्र ज्या गोष्टींमुळे या निवडणूकीत पराभव झाला त्या गोष्टी आता सुधारून रमेश आडसकर हे नव्या जोमाने आणि मोठ्या ताकतीने माजलगाव विधानसभेच्या निवडणूकीसाठी कामाला लागलेलेे आहेत, त्यांनी संपुर्ण माजलगाव मतदार संघ पिंजून काढलेला आहे. त्यामुळे प्रत्येक गावातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. विधानसभेच्या निवडणूका तोंडावर असून कोणत्याही क्षणी या निवडणूकीची अचारसंहिता लागू शकते, याच धरतीवर त्यांनी एक फेसबुक पोष्ट करून मोठी घोषणा केली आहे. सातत्याने मी जनतेच्या सुख-दुखात सहभागी झालो आहे, नुकताच मी मतदारसंघातील बहुतांश गावांचा दौरा केलेला आहे. जनता ही परिवर्तनासाठी सज्ज असून ताकतीने माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे विजयाचा ठाम विश्वास असल्यामुळे मी ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी आपल्या या फेसबुक पोष्टमध्ये म्हटले आहे. आडसकरांच्या या घोषणेमुळे आता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.