बीड, चोरीच्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडुन पोलीस ठाण्यात नेत असतानाच वाळूमाफियांसह जमलेल्या जमावाने पोलिसांना रोखत त्यांच्या अंगावर धावून मारहाण करण्याचा प्रकार बुधवारी गेवराईतील तलवाडा येथे घडला.
वाळू माफीयांची गेवराई तालुक्यात मुजोरी वाढत चाललेली आहे.बुधवारी(ता ७)दुपारी तलवाडा येथील गणेश नगर भागातुन वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तलवाडा पोलीस ठाण्याचे शिपाई विठ्ठल चव्हाण यांनी पकडले.सदर ट्रॅक्टर ठाण्याकडे नेत असतानाच येथील काही नागरिकांचा जमाव होत जमावातील एकाला ट्रॅक्टरला अडवे झोपवले.सरकारी कामात अडथळा निर्माण करत वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पळवून नेले.यावरुन विठ्ठल चव्हाण यांच्या तक्रारीवरून फुलाबाई मस्के,मुसा शिंदे,सुनिल शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे,चंदू मस्के, सर्जेराव मस्के, विशाल(पिंट्या) कुऱ्हाडे,शिवदास(काल्या)शिंदे,मुखारी शिंदे,अमोल मस्के,ईश्वर मस्के,कैलास पवार, दशरथ मस्के,मुसा मस्के,देवराव मस्के,शिवा पवार, पिंटू शिंदे,राजा पवार, कल्याण पवार,सुनिल मस्के,संजय पवार, कोंडिबा मस्के रा.सर्व गणेश नगर यांच्यासह इतर १० महिला व पुरुष यांच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार महेश जाधव करीत आहेत.