बीड

आता विश्‍वास मुंडे पुणे आयकरचे अतिरिक्त आयुक्त


बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्याचे भुमिपुत्र तथा छ. संभाजी नगर आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त विश्‍वास मुंडे यांच्यावर आता पुण्याची नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुणे आयकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विश्‍वास मुंडे हे परळी तालुक्यातील कन्हेरवाडी गावचे रहिवासी आहेत. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. आयकर विभागात चोखपणे काम करत त्यांनी आपल्या याच कामातून कर्तव्यपणा सिध्द करून दाखविलेला आहे. मागच्या काही महिण्यांपुर्वीच त्यांची छ. संभाजीनगर आयकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. याही ठिकाणी त्यांनी अगदी चोखपणे कर्तव्य निभावले होते. आता त्यांच्यावर पुण्याची नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुणे आयकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून ते आता काम पहाणार आहेत. त्यामुळे याही ठिकाणी अगदी चोख पध्दतीने ते कर्तव्य निभावतील, असा विश्‍वास प्रत्येकांला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!