बीड : आर्थिक देवाणघेवाणीतून परळी तालुक्यातील नाथ्रा गावात गोळीबार झाल्याची घटना घडल्याचे समजते आहे. या विषयी समजलेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या दरम्यान महादेव मुंडे व ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मुंडे यांच्यात आर्थीक वाद झाला होता, हा वाद विकोपाला गेला, व यातील एकाने आपल्या जवळील रिव्हॉल्वर काढत थेट हवेत गोळीबार केला . ही घटना वा-या सारखी गावात पसरली , गोळीबार घटनेने गावात दहशत निर्माण झाली . परळी ग्रामीण पोलीस प्रशासनास हि बाब समजताच त्यांनी नाथ्रा गावात घटनास्थळी भेट दिली . या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे समजते आहे . प्राथमिक माहिती नुसार ह्या घटनेचे कारण आर्थिक वादाचे असल्याचे समोर समजते आहे परंतु वास्तविक काय कारण आहे हे पोलीस तपास अंती समजणार आहे . गेल्या महिन्यातच परळी शहरात मरळवाडीचे सरपंच यांची गोळीबार करुन हत्या झाल्याची घटना ताजी असतांनाच परळी तालुक्यात सलग हि दुसरी घटना घडली असल्याने परळी तालुक्यात सर्व एकाच चर्चेला उधान आले आहे.