बीड

सहा जणांनी केली गर्भवतीस गंभीर मारहाण; आरोपींना तात्काळ अटक करण्याची कुटूंबीयांची मागणी, दिंद्रुड पोलीसात सहा जणांवर गुन्हा दाखल

दिंद्रुड । प्रतिनिधी
धारूर तालुक्यातील चाटगाव येथे शेतातील बांधाच्या कारणावरून एका गर्भवती महिलेस सहा जणांनी शनिवार रोजी तुंबळ मारहाण केली. या घटनेत दिंद्रुड पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत.

येथील अशोक चौरे व भीमराव बाबुराव चौरे हे शेतात एकमेकांचे शेजारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतातील बांधाच्या कारणावरून दोन्ही परिवारात वाद सुरू होता. यातच शनिवारी संध्या अशोक चौरे या घरात एकट्या असताना गवळणबाई भिमराव चौरे, रंजना भीमराव चौरे, सतीश भीमराव चौरे, भीमराव बाबुराव चौरे, अंजना गणेश नेमाने, कृष्णा चांगिरे यांनी गर्भवती संध्या यांना गंभीर मारहाण केली. जखमी महिलेस अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्व आरोपींवर संध्या चौरे यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील तपास सपोनि अण्णाराव खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे काॅ स्वाती वाघमारे करीत आहेत. मात्र अद्याप सर्व आरोपी फरार असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी चौरे परिवाराने केली आहे.

🔸चौकट –
कोणत्याही गर्भवती स्त्रीला मारहाण करणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. मात्र कसलीही दया-मया न दाखवता दगडाचं काळीज असलेल्या सहाही आरोपींनी माझ्या पत्नीस तुंबळ मारहाण केली. पोलीस प्रशासनाने फरार आरोपींना तात्काळ गजाआड करून माझी पत्नी व आम्हाला न्याय द्यावा असे मत माध्यमांशी बोलताना संध्या चौरे यांचे पती अशोक चौरे यांनी मांडले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!