बीड

तहसिलदार खोमणेंचा वाळू माफियांना दणका, त्या 22 वाळू माफिया विरूद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

गेवराई दि 26 ( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभूवन परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करूण त्यांची बेकायदेशीर विक्री करण्याऱ्याला गेवराई च्या तहसिलदार संदिप खोमणे यांनी चांगलाच दणका दिला आहे केनीव्दारे वाळू उपसा करणाऱ्या 22 वाळू माफिया विरूद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात नावानिशी गून्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,तालुक्यातील राक्षसभूवन परिसरात दहशत माजवून वेवेगळ्या ठिकाणा वरूण वाळू उपसा करण्याचे पॉइंन्ट तयार केले होते या प्रकरणी गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे यांनी वाळू उपसा रोखण्यासाठी याठिकाणचे अनेक साठेही जप्त केले परंतू वाळू उपसा थांबत नव्हता हा अवैध वाळू उपसा बंद करायच्या उद्देशाने राक्षसभूवन मधील रेकॉर्डवरील 22 वाळू माफिया यांच्या विरूद्ध नावानिशी गून्हा दाखल करण्यात आला आहे तसेच केनी,ट्रॅक्टर,लोडर,यांचा यात समावेश आहे तसेच या माफियानी एक हजार ब्रास वाळू आपल्या स्वत;च्या अर्थिक फायद्यासाठी विक्री केली असल्याने हा गून्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात राक्षसभूवन सज्जाचे तलाठी गोंविद ढाकणे यांच्या फिर्यादीवरूण गून्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि अंनता तांगडे हे करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!