बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे सरसावल्या आहेत. त्याअनुषंगानेच आज दि. 21 जुलै रोजी
भाजपचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यात कार्यकारिणीची बैठक होणार आहे. तरी या बैठकीला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आ. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
येत्या दिड महिण्यात विधान सभा निवडणूकीची अचारसंहिता लागणार आहे. त्याअनुषंगानेच सध्या महाराष्र्ट्रातील सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. राज्याच्या मासलिडर असलेल्या पंकजाताई मुंडेही या निवडणूकीच्या तयारीला लागल्या आहेत. पुन्हा राज्यात महायुतीचेच सरकार आणायचे असा संकल्प त्यांनी केला आहे. याच पार्श्वभुमिवर आज पुण्यातील बालेवाडी स्टेडीअमवर भाजपची कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती असाणार आहे. तसेच या बैठक़ीसाठी जवळपास साडे पाच हजाराहून अधिक कार्यकर्ते येणार आहेत. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्याचा संकल्प या बैठकीत केला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनआ. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.