बीड

गुन्हेगारी प्रवृत्तीला सीसीटीव्ही कॅमेरामुळे वचक बसेल : पालकमंत्री, पहिल्या टप्प्यात बीड जिल्ह्यात सुरक्षेसाठी एकूण 426 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण

बीड, 20: ( जिमाका ) जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला सीसीटीव्ही कॅमेरामुळे आळा बसेल असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले. आज बीड येथे झालेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. बीड जिल्हायातील बीड, परळी आणि माजलगाव शहरात एकूण 426 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यासाठी एकूण 12 कोटी 95 लाख रुपये खर्च आला आहे.

बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार प्रकाश सोळंके, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी श्री मुंडे बोलत होते, बीड जिल्ह्यातील गुन्हेगार तसेच हिंसक प्रवृत्तीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे वचक बसेल, ज्या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही तसेच त्या आसपासच्या परिसरही अशा घटनांपासून सावध राहील असेही श्री मुंडे यावेळी म्हणाले.
अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणेमुळे गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी होईल, तसेच झटपट तपास आणि लवकर निकाल व न्याय ही प्रक्रिया सोपी होईल. हा पहिला टप्पा आहे, आगामी जिल्हा नियोजन मधून उर्वरित तालुक्याची अन्य शहरे कव्हर केली जातील, यावेळी म्हणाले. पुढील एक महिन्याभराचा अहवाल पोलीस अधीक्षकांनी सीसीटीव्ही कॅमेरा निगराणी करणाऱ्या टीम कडून घेऊन गुन्हेगारीचे प्रमाणात किती घट झाली हे पहावे. यासह जिल्हा नियोजन समितीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा अद्यावतीकरणासाठी 80 टक्के निधी आणि पोलीस विभागाकडून 20 टक्के निधी असा राखीव ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांना दिले.

बीड जिल्ह्यातील मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्गला जोडले आहेत यापैकी कोणता भाग हा ब्लॅक स्पॉट म्हणून आहे त्याची तपासणी करून पुढील काळात अशा ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी असावी, अशी अपेक्षाही त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून यावेळी व्यक्त केली.

बीड जिल्हा घटकातील पोलीस स्टेशन करिता वर्ष 2023 24 मध्ये जिल्हाधिकारी तथा सदस्याचे जिल्हा नियोजन समिती कडून एकूण 17 कोटी 44 लाख निधी प्राप्त झाल्यामुळे सीसीटीव्ही सर्व उपकरणे खरेदी करून बसविण्यात आले. सध्या एकूण 426 ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेली आहेत. हे सीसीटीव्ही पहिल्या टप्प्या अंतर्गत लावण्यात आलेले आहेत. यामध्ये बीड शहरात एकूण कॅमेऱ्यांच्या ठिकाणांची संख्या 45 असून कॅमेऱ्यांची संख्या 178 अशी आहे. यासाठी चार कोटी पन्नास लक्ष रुपये खर्च लागला आहे.
परळी शहरात कॅमेऱ्याचे एकूण ठिकाणे 35 असून कॅमेऱ्याची संख्या 133 एवढी आहे यासाठी तीन कोटी 50 लक्ष रुपये खर्च करण्यात आलेला आहे. माजलगाव शहरात 26 ठिकाणी 115 कॅमेरे लावण्यात आले असून चार कोटी 94 लाख रुपये यासाठी खर्च झालेला आहे.
आष्टी शहरात एकूण 23 ठिकाणी 90 कॅमेरे लावलेले जाणार आहेत. यासाठी दोन कोटी 50 लक्ष रुपये खर्च होणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!