बीड, दि.10 (लोकाशा न्युज):- नव्या पिढीतील राजकीय व्यक्तिमत्त्व असलेले वारोळा गावचे माजी सरपंच तुकाराम चव्हाण यांचे अल्पशा आजाराने संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले.
मागील काही दिवसापासून आजारी असल्याने संभाजी नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारात यश न आल्याने 10 जुलै रोजी रुग्णालयातच निधन झाले. आपल्या कार्यकाळात राजकीय कारकीर्द गाजवली होती. अनेक नागरिकांच्या अडीअडचणीना धावून जात मदत करून ज्ञान मिळवून द्यायचे, तुकाराम चव्हाण यांची अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने चव्हाण कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे. चव्हाण कुटुंबायांच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे. त्यांचा अंत्यसंस्कार दि.10 रोजी दुपारी 4 वाजता जोड तांडा वारोळा येथे करण्यात येणार आहे.