बीड

आष्टीचे डीवायएसपी अभिजित धाराशिवकर यांची बदली, बीडचे तात्कालिन डीवायएसपी सुधिर खिरडकर यांची सोलापुर तर केजच्या तात्कालिन डीवायएसपी आरती बनसोडे यांची पुणे येथे बदली


बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : आष्टी उपविभागाचे डीवायएसपी अभिजित धाराशिवकर यांची बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे पालघर उप विभागात उपविभागीय पोलिस अधीकारी म्हणून नवी जबाबदारी देण्यात आली आहे. बुधवारी त्यांच्यासह 68 पोलिस अधीकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये यापुर्वी बीड उपविभागात डीवायएसपी म्हणून जबाबदारी संभाळणारे डीवायएसपी सुधिर खिरडकर यांची लातूर येथून सोलापुर शहर येथे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच केज येथे यापुर्वी डीवायएसपी म्हणून कर्तव्य बजावणार्‍या आरती बनसोडे यांची पुणे शहर येथून अप्पर पोलिस अधीक्षक (ए.ट.प) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे येथे बदली करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीपुर्वी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. त्यामुळे या दोन महिण्यात बीडसह राज्यातील अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्याचे सर्वांना पहायला मिळणार आहेत.   

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!