बीड

नामदेवराव क्षीरसागर यांच्या निधनाने जिल्हयाने ज्येष्ठ आणि अभ्यासू पत्रकार गमावला, पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

बीड।दिनांक ०१।
दैनिक चंपावतीपत्रचे संपादक नामदेवराव क्षीरसागर यांच्या निधनाने जिल्ह्याने एक ज्येष्ठ आणि अभ्यासू पत्रकार गमावला आहे, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर यांच्या दुःखद निधनाने पत्रकारितेचे मोठे नुकसान झाले आहे. क्षीरसागर यांनी दैनिकाच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम तर केलेच याशिवाय बीडला रेल्वे आणण्यातही त्यांचे योगदान महत्वाचे होते. संस्कार प्रबोधिनीच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळ देखील त्यांनी उभी केली.बीड जिल्हा व मराठवाड्यातील जनसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडून न्याय मिळवून दिला. केवळ पत्रकारिताच
नव्हे तर विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम त्यांनी केले. एक मनमिळावू आणि व्यासंगी संपादक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने जिल्हा एका ज्येष्ठ व अभ्यासू संपादकाला मुकला असून पत्रकारितेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!