बीड

बीडच्या 7 विद्यार्थ्यांकडे बिहारचे हॉल तिकीट; नीटच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड


बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज): लातूर येथील पोलिसांनी चौकशी केलेल्या 14 पैकी 8 विद्यार्थ्यांकडे बिहार राज्यातील हॉल तिकीट आढळून आली आहेत. यामध्ये एक लातूरचा तर उर्वरित सात विद्यार्थी हे बीड जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे आता बीड जिल्हा तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे.
नीट परीक्षेतील घोटाळ्याचे धागेदोरे लातूरनंतर आता बीडपर्यंत येऊन पोहोचले आहेत. बीड जिल्ह्यातील 7 विद्यार्थ्यांकडे बिहार राज्यातील प्रवेशपत्रे आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लातूर येथील पोलिसांनी चौकशी केलेल्या 14 पैकी 8 विद्यार्थ्यांकडे बिहार राज्यातील हॉल तिकीट आढळून आली आहेत. यामध्ये एक लातुरचा तर उर्वरित सात विद्यार्थी हे बीड जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे आता बीड जिल्हा तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे.
पोलीस यंत्रणांच्या ताब्यात असलेला आरोपी मुख्याध्यापक पठाण आणि शिक्षक जाधव यांच्या मोबाइलमध्ये एकूण 22 विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे आढळून आली. यात लातूर व बीड जिल्ह्यातील विद्यार्थी असल्याचे समोर आले. आतापर्यंत 14 जणांची चौकशी झाली असून, उर्वरित पालक-विद्यार्थ्यांची चौकशी केली जाणार आहे. लातूर मधील नीट गुणवाढ प्रकरणातील आरोपी इरण्णा कोनगलवार हा अद्यापही तपास यंत्रणांच्या हाती लागला नाही. त्याच्या अटकेसाठी पथके मागावर असून, तो हाती लागल्यानंतरच तपासाला दिशा मिळणार आहे. त्यानंतर या गैरप्रकारातील सर्व धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लातूरमध्ये नियुक्त केलेल्या दोन एजंटाच्या अटकेची कुणकुण लागताच त्याने रातोरात लातूर सोडले. पथकांनी सर्वत्र शोध घेतला आहे, मात्र तो चकवा देत पसार झाला आहे. लातूर नीट प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला मुख्याध्यापक पठाण, शिक्षक संजय जाधव याची चौकशी पूर्ण झाल्याचा दावा स्थानिक तपास यंत्रणांनी केला आहे. यातील गंगाधरची चौकशी सीबीआय करणार असून, त्यांच्या मदतीला लातूर पोलीस राहणार आहे. या गुन्ह्याचा तपास वर्ग करण्याची कागदोपत्री प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!