बीड

आता राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मिळाला बहुमान, यापुर्वी त्यांचे पतीही होते चीफ सेक्रेटरी


मुंबई, दि. 30 (लोकाशा न्यूज) : महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर विराजमान होणार्‍या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. विशेष बाब म्हणजे सुजाता यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे या पदावर काम करणारे पहिले पती-पत्नी म्हणून देखील त्यांची ओळख असणार आहे.
सुजाता सौनिक यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळलेला आहे. त्यानंतर त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ लाभणार आहे. त्या जून 2025 मध्ये निवृत्त होणार आहेत. रविवारी सायंकाळी पाच वाजता त्यांनी मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून मुख्य सचिव पदाची सुत्रे हाती घेतली.सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ अधिकारी असून त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. या आधी मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम केलेले आहे. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे आता पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. या पदासाठी सेवाज्येष्ठतेनुसार 1987 च्या बॅचमधील गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (1988) हे सचिवपदााठी दावेदार मानले जात होते, मात्र यामध्ये सुजाता सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुजाता सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगड येथे झाले आहे. पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतलीय. त्यानंतर त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृहमंत्रालय, सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्वाच्या पदावर देखील कारभार सांभाळलेला आहे. त्या गेल्या तीन दशकांपसून प्रशासकिय सेवेत कार्यरत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!