बीड

परळीतील खुनाचा उलगडा, घरी बोलावून घेत डोक्यात झाडली गोळी, बबन गित्तेसह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल


परळी :
मरळवाडीचे सरपंच बाबुराव आंधळे यांच्या खुनाचा उलगडा झाला असून या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयीत आरोपींनी बाबुराव आंधळे व ग्यानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलवले होते. त्या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणलेस का असे म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली. बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असे म्हणताच बबन गीते यांनी कमरेचे पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली तसेच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्याने मारहाण केली तर महादेव गीते याने ग्यानबा गीते यांना गोळी मारली परंतु ती त्यांच्या छातीला चाटून गेल्याने ते जखमी झाले. दरम्यान या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

पोलीस अधीक्षकांचा परळीत तळ

परळीत झालेल्या गोळीबारानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळी रात्री उशिरा पाहणी केली. पोलीस अधीक्षक यांनी परळीतच तळ ठोकत तपासाला देखील गती दिली असून, आता संशयीत आरोपींच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले आहेत.

सरपंच बापूराव आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे होते. तर बबन गीते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. फिर्यादीत पैशाचा उल्लेख असला तरी या खुनामागे राजकीय कारण होते का? हे देखील तपासात समोर येऊ शकणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!