बीड

भारत ठरला विश्वविजेता, सूर्यकुमार यादवचा झेल आणि जसप्रीत बुमराहचे षटक ठरले टर्निंग पॉईंट

भारतीय संघाने १० वर्षांचा आयसीसी ट्रॉफिचा दुष्काळ संपवत भारताने टी-२० विश्वचषकाचे वीजेतेपद पटकावले आहे. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-२० चॅम्पियन ठरला. भारताने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात आश्चर्यकारक विजय मिळवला आहे. रोहित शर्मा, हार्दिक पंड्यासारखे भारताच्या सर्वच खेळाडूंच्या डोळ्यातून विजयाश्रू आले.

शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले. २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन बनला होता. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने विजय मिळवत सर्वांचे स्वप्न साकारले. सामन्यातील अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने दमदार गोलंदाजी केली. भारताला विजयासाठी ६ षटकांत १६ धावांची गरज होती. तर मैदानात मिलर आणि केशव महाराजची जोडी होती. हार्दिकने फुलटॉस चेंडू टाकला जो मिलरने जोरदार फटका लगावला पण सीमारेषेवर उभा असलेल्या सूर्याने आश्चर्यकारक झेल टिपला आणि भारताने पूर्ण सामना फिरवला. आणि या सामन्यात भारताचा विजय झाला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!