बीड

अविनाश पाठक यांनी स्विकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार, पदभार स्विकारताच कामाला केली सुरूवात


बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्याचे हित डोळ्यासमोर ठेवून जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी नेहमीच प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळत गेले, त्यामुळेच एक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी बीड जिल्ह्यात ठसा उमटविला, त्यांच्या बदलीनंतर शुक्रवारी अविनाश पाठक यांनी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार दीपा मूधोळ मुंडे यांच्याकडून स्वीकारला. बुधवारी दिनांक 26 जून रोजी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सेवा यांनी अविनाश पाठक यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्याबाबतचे आदेश काढले होते. त्या आदेशाप्रमाणे काल दीपा मुधोळ मुंडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार श्री पाठक यांच्याकडे सोपविला. तत्पूर्वी श्री. पाठक यांनी सकाळी आपल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार संगीता देवी पाटील यांना सोपविला. याप्रसंगी  परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, कविता जाधव, महेंद्र कुमार कांबळे यासह वेगवेगळे विभागाचे विभाग प्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान पदभार स्विकारताच पाठकांनी कामाला सुरूवात केली आहे. पाठकांना असलेला जुना अनुभव आणि कामातील असलेला हातखंडा नक्कीच बीड जिल्ह्याला पुढे घेवून जाणारा ठरणार आहे. जिल्हाधिकारी म्हणून दिपा मुधोळ यांनी बीड जिल्ह्यात 14 महिणे कर्तव्य बजावले, त्यांनीही जिल्ह्याला नेहमीच पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या याच प्रयत्नांना खर्‍या अर्थाने यशही मिळाले, जिल्ह्यातील वाढते बालविवाह रोखण्यात त्यांना मोठे यश आहे. तसेच मराठवाड्यात सर्वात जास्त कुणबी प्रमाणपत्र देणार्‍या एक यशस्वी अन् अभ्यासू जिल्हाधिकारी म्हणूनही दिपा मुधोळ यांनी ठसा उमटविण्याचे काम केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!