बीड

बीडच्या भाजी मंडईत आढळले मृत अर्भक

बीड-शहरातील सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेल्या भाजी मंडईत आज सकाळी १०.१५ च्या सुमारास मृत अवस्थेतेतील अर्भक आढळून आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून शहर पोलीस ठाण्याचे आशपाक सय्यद आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

बीड शहरातील भाजी मंडईत बीएसएनएल टॉवरजवळ आज सकाळी साधारण तीन ते साडेतीन महिन्याचे मृत अवस्थेतीतील अर्भक परिसरातील नागरिकांना आढळून आल्यानंतर याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली होती. हे अर्भक कोणाचे आहे? त्याला कोणी त्या भागात आणून टाकले? याचा शोध घेण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे. बीड शहरात मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!