बीड

संतोष साबळे यांची बदली, गणेश मुंडेंकडे बीड स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार!

बीड दि.26 : येथील स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची बुधवारी (दि.26) बदली झाली असून स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांच्याकडे तात्पुरता देण्यात आला आहे.

3 जुलै 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. अवघ्या एक वर्षाच्या पूर्वीच साबळे यांची बदली करण्यात आली आहे. सध्या स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांच्याकडे तात्पुरता देण्यात आला आहे. तसेच गणेश मुंडे यांनीही महामार्ग पोलीस विभागात बदली झालेली आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचा प्रमुख म्हणून कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर संभाजीनगर ठाण्याचे पोलीस शेख उस्मान चांद यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!